महाराष्ट्र
अतिवृष्टीने घर कोसळून चार जण जखमी
अतिवृष्टीने घर कोसळून चार जण जखमी
फोटो: ठाणे वैभव
शहापूरात सापटे पाड्यातील घटना
शहापूर: मागील दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहलोंडे अंतर्गत येणाऱ्या सापटेपाडा येथे घर कोसळून चारजण जखमी झाले आहेत.
त्र्यंबक पाचालकर यांचे राहते घर पडले असून यामध्ये लाडक्या त्र्यंबक पाचालकर, जनी पाचालकर, शांता पाचालकर आणि विजय पाचालकर हे रात्री एकत्र बसले असताना अचानक घर कोसळल्याने घरातील चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. घटना गुरुवारी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान घडली. जखमी व्यक्तींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र अघई या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र मार जास्त लागल्याने त्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रस्ता नसल्याने जखमींना डोलीचा आधार
सापटेपाडापासून मुख्य रस्ता दोन किमी लाब असून या पाड्याला अजूनही मुख्य रस्त्यास जोडणारा रस्ता उपलब्ध नाही. रस्ता नसल्याने गावातील कार्यकर्त्यांनी झोळी करून जखमी व्यक्तींना मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन गेले व त्या ठिकाणावरून त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
300x450
300x600