जिल्हा

फळेगावात वीज पडून चार वासरांचा मृत्यू

फळेगावात वीज पडून चार वासरांचा मृत्यू
फळेगावात वीज पडून चार वासरांचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण तालुक्यातील मौजे फळेगाव येथे काल सायंकाळी सुमारे 4.30 च्या सुमारास आकाशात वादळ व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना गुरुनाथ बांगर यांच्या बेड्यावर वीज पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या आघातात चार वासरे जागीच मृत्यूमुखी पडली आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही. वीज पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून, संबंधित अहवाल तयार करून तो पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याची तजवीज करण्यात आली आहे. प्रशासनाकडून शासकीय मदतीसाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गुरुनाथ बांगर यांच्या कुटुंबाला या घटनेने आर्थिक आणि मानसिक धक्का बसला असून, शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475