जिल्हा
माजी पत्रकार, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन विजयी
माजी पत्रकार, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन विजयी
फोटो: ठाणे वैभव
मुंबई: माजी पत्रकार आणि भाजपाचे माध्यम विभागाचे प्रभारी आणि प्रवक्ते नवनाथ बन यांना मुंबईच्या वॉर्ड क्र. १३५ मधून उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या नवनाथ बन यांना या वॉर्डातून यश मिळाले असून त्यांचा विजय झाला आहे. भाजपाकडून यंदाच्या निवडणुकीत अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी नवनाथ बन एक होते.
नवनाथ बन ८५७८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) समीक्षा सक्रे यांचा पराभव केला आहे. नवनाथ बन यांच्या प्रचारासाठी अनेक नेत्यांनी वॉर्डात हजेरी लावली होती. भोजपुरी अभिनेते, भाजपा माजी खासदार मनोज तिवारी यांनी वॉर्डात प्रचार केला होता. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475