जिल्हा
गोव्याहून येणारा दीड कोटींचा विदेशी मद्यसाठा हस्तगत
गोव्याहून येणारा दीड कोटींचा विदेशी मद्यसाठा हस्तगत
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली विभागाच्या पथकाने गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजता पनवेल-मुंब्रा रोडवरील उत्तरशीव येथे करण्यात आली. गुप्त माहितीनुसार आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्रमांक MH-20-GC-6450) थांबवून तपासला असता, त्यामध्ये गोवानिर्मित विदेशी मद्याचे एकूण एक हजार बॉक्स आढळून आले.
टेम्पोचालक मोहम्मद समशाद सलमानी आणि देवेंद्र मेघवाल या दोघांना तत्काळ अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत एक कोटी ३१ लाख ५२ हजार इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक डी.बी. काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पी.यू. निकाळजे, ए.एस. वडक्ते, अ.गो. सराफ, आर.एन. आडे तसेच जवान आर.बी. खेमनर, व्ही.एस. अहिरे आणि महिला जवान ए.जे. नगरकर यांनी संयुक्तपणे केली. प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
300x450
300x600