जिल्हा
आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये झेंडा
आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये झेंडा
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंबईतील पवई आयआयटी मध्ये ब्लिक्स या कंपनीतर्फे भरवण्यात आलेल्या "ROBO PRECISION" या स्पर्धेत ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल या संस्थेतील विद्यार्थ्यांनी "ACHIEVER'S STEM LEARNING" च्या तज्ञ रोबोटिक्स इंजिनीअरच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय स्थान पटकावून ठाण्याचा आणि संस्थेचा मान वाढविला आहे. ६० महाविद्यालयातील प्रतिस्पर्धी आणि त्यांच्यातील रोबोट्सची उत्कंठा वाढवणारी स्पर्धा यातून विद्यार्थ्यांनी जे यश मिळविले आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे.
संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे आणि सेक्रेटरी डॉ. प्रदीप ढवळ यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले आहे. शाळेत "अचीवर्स स्टेम लर्निग " ही रोबोटिक्स आणि कोडिंगची सर्विस देणारी संस्था आणि तिचे इंजिनियर्स हे डॉ. प्रदीप ढवळ यांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आणि प्रेरणा तसेच आशीर्वाद यातून प्रेरित होऊन गेली तीन वर्षे संस्थेतील विद्यार्थ्यांना STEM education देत आहेत.
महाविद्यालयातील जी टीम या स्पर्धेत सहभागी झाली होती त्यात अनुपमा सिंग, प्रियांका देसाई, शुभम जावळे, विष्णू गुप्ता, अक्षरा काजारी, रवितेजा आदाले, पवन पेडणेकर, युक्ती जाधव यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांना ACHIEVER'S STEM LEARNING कंपनीचे श्री.समीर, श्री. सुशिल यांचे मार्गदर्शन लाभले आणि संस्थेच्या प्राचार्या संपदा कुलकर्णी यांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475