जिल्हा

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ फोटो: ठाणे वैभव
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ जाहीर केली आहे. याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर घरभाडे भत्ता ८-१६-२४ टक्क्यांवरून वरून १०-२० आणि ३० टक्के वार्षिक वेतन वाढीचा दर दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. “कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा थकबाकी वैधानिक देणी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपये अदा करण्यास शासन कटिबद्ध आहे”, असेही सरनाईक म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475