जिल्हा

ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन

ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन
ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन फोटो: ठाणे वैभव
जिल्ह्यातून १० हजार संस्थाचे प्रतिनिधी राहणार उपस्थित ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासातील विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा त्याचबरोबर, मार्गदर्शन करण्यासाठी २० ते २२ डिसेंबर या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच महाअधिवेशन यापूर्वी जून महिन्यात होणार होते. मात्र, कोकण पदवीधर निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. सुमारे १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार असुन यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील ३४ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी, आजवर गृहनिर्माण संस्थांच्या अनेक समस्या सरकार दरबारी मांडून त्यांचे निरसन केले आहे. तरीही गृहनिर्माण संस्थांसाठी मोठया प्रमाणात कायद्यात तसेच नियम व उपविधीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित केल्याचे सांगितले. ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, गृहनिर्माण मंत्री आदींसह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त असे अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून अधिवेशनातील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी,अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी हाऊसिंग फेडरेशनने https://bit.ly/thanehousingmahaadhiveshan2024 ही लिंक उपलब्ध केली आहे. १५ डिसेंबरपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475