जिल्हा

ठाण्यात इन्फ्ल्युएंझाचा पहिला मृत्यू

ठाण्यात इन्फ्ल्युएंझाचा पहिला मृत्यू
ठाण्यात इन्फ्ल्युएंझाचा पहिला मृत्यू फोटो: ठाणे वैभव
कोरोनामुळेही दहा दिवसांत तिघांचा मृत्यू ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचा पहिला मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे वय ७९ वर्ष असून एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असून कोरोनामुळेही गेल्या १० दिवसांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला कोरोनाचा संसर्ग गेल्या दोन आठवड्यांपासून पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात करोनाची सक्रीय रुग्णसंख्या ३०६ इतकी झाली आहे. त्यापैकी २०६ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत, तर कल्याण-डोंबिवली शहरात २५, नवी मुंबई शहरात २८, उल्हासनगर शहरात तीन, भिवंडी शहरात १८, मीरा-भाईंदर शहरात १० आणि ग्रामीण भागात १६ इतके सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या दहा दिवसांत दोन वृद्धांचा मृत्यू झालेला असून, त्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याधी होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे आठवडाभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन इतकी झाली असून त्याचबरोबर ‘एच ३ एन २’चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहरात इन्फ्ल्युएंझाचे १९ रुग्ण ठाणे शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोके वर काढले असून, या आजाराचे आत्तापर्यंत १९ रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यातच बुधवारी या आजारामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475