जिल्हा

न्यायालयाच्या इमारतीतील स्टोअर रुमला आग

न्यायालयाच्या इमारतीतील स्टोअर रुमला आग
न्यायालयाच्या इमारतीतील स्टोअर रुमला आग फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे जिल्हा सत्र न्यायालय येथील विस्तारित दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये इलेक्ट्रिक वायरला आग लागून कागदपत्रे जाळून खाक झाल्याची घटना घडली. मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये कागदपत्रांना व इलेक्ट्रिक वायरिंगला आग लागली. यात स्टोअर रूममधील कागदपत्रे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे नगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहनासह, एक रेस्क्यू वाहनासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475