महाराष्ट्र

सीबीडी बेलापूरमध्ये आग, पाच झोपड्या जळून खाक

सीबीडी बेलापूरमध्ये आग, पाच झोपड्या जळून खाक
सीबीडी बेलापूरमध्ये आग, पाच झोपड्या जळून खाक फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: बेलापूर सीबीडी सेक्टर ८ येथील दुर्गामाता झोपडपट्टीत सोमवारी सकाळी ११ वाजता स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वयंपाक बनवताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत एक ते दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत एकूण पाच ते सहा झोपड्या जळून खाक झाल्या असून सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताला वाफ लागून तो जखमी झाला आहे. सदर झोपडपट्टी ही पूर्णपणे सिडकोच्या जागेवर वसली असून त्या झोपडपट्टीवर कारवाई करावी म्हणून सिडको अतिक्रमण विभागाला पत्र दिले आहे, अशी माहिती मनपा बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475