जिल्हा

अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान झेपावले

अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान झेपावले
अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान झेपावले फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मागील अनेक वर्षांपासून साकारत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवसायिकरित्या सुरु झाले आहे. नाताळच्या मुहूर्तावर गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अखेर विमानोड्डाणास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई विमानतळावर पहिले विमान सकाळी ८ वाजता आकासा एअर लाईन्सचे उतरले तर सकाळी ८.४० वाजता इंडिगोचे पहिले विमान हैदराबादसाठी उडाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावरून प्रत्यक्षात प्रवास करण्याची प्रतीक्षा संपली आहे. या विमानतळावर सकाळी ८ वाजता आकासा एअर लाईन्सचे उतरले तर सकाळी ८.४० वाजता इंडिगोचे पहिले विमान हैदराबादसाठी उडाले. अकासा एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस, स्टार एअर या विमान कंपन्यांनीही पहिल्या दिवशी सेवा दिल्या. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्यांदा विमानप्रवास करण्यासाठी अनेक जणांनी बुकिंग केले होते. त्यामुळे पहिल्या दिवशी सुमारे चार हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला. प्रवाशांच्या स्वागतासाठी विमानतळ व्यवस्थापनाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी प्रवासादरम्यान विमानतळावर आणि विमानातही प्रवाशांना भेटवस्तू दिल्या गेल्या. पहिल्या दिवशी नवी मुंबई ते गोवा, कोची, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी विमानसेवा देण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी येथील भूमिपुत्रांची जमीन संपादित केल्याने या जमिनीवर हे विमानतळ आकारास आले. त्यामुळे ज्यांच्या जमिनीवर हे विमानतळ सुरू झाले त्या भूमिपुत्रांना अदानी फाउंडेशनतर्फे पहिल्या विमानातून मोफत विमान प्रवासाची सोय करण्यात आली होती. जवळपास २७, गावातील महिला मंडळ सदस्यांनी या मोफत विमान प्रवासाचा अनुभव घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला १,५१५ ड्रोनचा एक नेत्रदीपक ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. समन्वयाने उडणाऱ्या या ड्रोननी आकर्षक हवाई रचनांनी आकाश उजळून टाकले, ज्यात थ्रीडी कमळाची फुले, विमानतळाचा लोगो, हरित विमानतळाची दृश्ये, मुंबईवरून उडणारे विमान, भारताचा उदय अशी प्रतिमा आणि कमळाकृती संकल्पनेवर आधारित आकर्षक टर्मिनल रचना यांचा समावेश होता. या दृश्यांमधून संपूर्ण प्रकल्पाची दृष्टी आणि व्यापकता प्रभावीपणे मांडण्यात आली. पहिल्या विमानाचे आगमन झाल्यावर धावपट्टीवर पाण्याचे फवारे उडवून 'वॉटर जेट' (पाण्याच्या तोफांची) सलामी देऊन स्वागत करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475