जिल्हा

सदोष मतदार याद्यांचा ताप; आचारसंहिता डिसेंबरअखेर?

सदोष मतदार याद्यांचा ताप; आचारसंहिता डिसेंबरअखेर?
सदोष मतदार याद्यांचा ताप; आचारसंहिता डिसेंबरअखेर? फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी आणखी दहा दिवस वाढवून देण्यात आले आहेत. परिणामी महापालिकेची आचारसंहिता उशिरा लागण्याची शक्यता आहे. राज्यातील मतदार यादीचा घोळ चव्हाट्यावर आला असून ठाण्यात सुमारे ८५ हजार दुबार मतदार आढळून आले आहेत. या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती, परंतु अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी दहा दिवसांनी वाढवून २० डिसेंबर असा करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २२ डिसेंबरऐवजी २७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. त्यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याची तारीख देखील पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475