जिल्हा

महिला तिकीट तपासणीसाला तरुणीकडून बेदम मारहाण

महिला तिकीट तपासणीसाला तरुणीकडून बेदम मारहाण
महिला तिकीट तपासणीसाला तरुणीकडून बेदम मारहाण फोटो: ठाणे वैभव
ठाणे रेल्वे स्थानकातील घटना ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाला तिकीट विचारले असता, तिने महिला मुख्य तिकीट तपासणीसाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या १८ वर्षीय मुलीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलावर सोमवारी सकाळी ३९ वर्षीय मुख्य तिकीट तपासणीस प्रवाशांचे तिकीट तपासत होत्या. त्यावेळी १८ वर्षीय मुलगी तिच्या मोबाईलवर बोलत पादचारी पुलावरून जात होती. तिला मुख्य महिला तिकीट तपासणीसाने तिकीटाबाबत विचारले. त्यावेळी तिने मी येथेच राहत असून पादचारी पूल ओलांडून पलिकडच्या दिशेने जात असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तपासणीसाने तिचा पत्ता पाहण्यासाठी तिच्याकडून आधारकार्डची मागणी केली. परंतु ती पॅन कार्ड दाखवू लागली. त्यामुळे तपासणीसाने पुन्हा तिच्याकडून आधारकार्डची मागणी केली. त्यावेळी तिने मोबाईलवर संपर्क साधलेल्या व्यक्तीशी बोलताना तपासणीसाला शिवीगाळ करत आधारकार्ड व्हाॅट्सॲपवर पाठविण्यास सांगितले. तपासणीसाने तिला शिवीगाळ करु नकोस असे सांगितले असता, तरुणीने अचानक हातातील मोबाईल फोनने तपासणीसाला मारहाण सुरु केली. त्यानंतर तपासणीसाने तिला ठाणे स्थानकातील व्यवस्थापकांच्या दालनात नेले. तिची चौकशी केली असता, ती महिला घरकाम आणि ब्यूटीशियनचा व्यवसाय करत असून वागळे इस्टेट भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तपासणीसाने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे त्या मुलीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475