जिल्हा

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’ फोटो: ठाणे वैभव
ॲग्रिस्टॅक ही योजना यशस्वी राबविण्यासाठी प्रशासन सज्ज ठाणे : विविध योजनांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅक (डीजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर) ही योजना राबविण्यात येत असून या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ॲग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी मदत होणार आहे. ॲग्रीस्टॅक संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे नियोजन व कामकाजाकडे नियंत्रण असणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एम एम बाचोटीकर यांनी दिली. सर्व ग्रामपंचायतींमार्फत कॅम्प नियोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून देणार आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच निर्मितीमध्ये पथकातील कर्मचारी प्राथमिक जबाबदारी पार पाडणार आहेत. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डीजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू-संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होणार असून ॲग्रिस्टॅक ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475