जिल्हा
शेतकरी मदतीपासून वंचित; सरकारकडून फसव्या घोषणा
शेतकरी मदतीपासून वंचित; सरकारकडून फसव्या घोषणा
फोटो: ठाणे वैभव
ठाकरे गटाची ठाण्यात निदर्शने
ठाणे: अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहचलेली नाही. त्यांना भरीव मदत मिळावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमीर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने आंदोलन पुकारले असून शेतकरी कर्जमुक्त झालेच पाहिजेत. हेक्टरी ५० हजार शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी मागणी श्री.विचारे यांनी केली.
यावेळी संपर्कप्रमुख नरेश मणेरा, गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, भिवंडी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, संपर्कप्रमुख एम के मढवी, कल्याण ग्रामीण रोहिदास मुंडे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, पुष्पलता भानुषाली, सुनील पाटील, प्रदीप शिंदे, संजय तरे, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, वसंत गव्हाळे, राजेंद्र महाडिक, माजी नगरसेवक मंदार विचारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475