जिल्हा

रस्त्यांवर पडलेला पालापाचोळा, फांद्या मुख्यालयात टाकणार

रस्त्यांवर पडलेला पालापाचोळा, फांद्या मुख्यालयात टाकणार
रस्त्यांवर पडलेला पालापाचोळा, फांद्या मुख्यालयात टाकणार फोटो: ठाणे वैभव
मनसेचा ठाणे महापालिकेला इशारा ठाणे: मागिल आठवड्यात मुसळधार पावसात पडलेल्या झाडांच्या फांद्या शहरातील रस्त्या-रस्त्यावर पडल्या असून हा पालापाचोळा पाच दिवसांत उचलला नाही तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मागिल आठवड्यात झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहराच्या चौक, रस्ते आणि सेवा रस्त्यांवर सुमारे सहाशे झाडे उन्मळून पडली होती. या पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि पालापाचोळा मागिल काही दिवस रस्त्यावरच पडून आहे, त्यामुळे शहरात कचराच कचरा दिसत आहे. याची दखल घेऊन मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह विविध ठिकाणी पडलेल्या झाडांची पाहणी केली. काही दिवसांत हा कचरा कुजून त्याची दुर्गंधी पसरण्याची भीती व्यक्त करून श्री. मोरे यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन हा ग्रीन कचरा पाच दिवसात उचलला नाही तर तो कचरा महापालिकेच्या मुख्यालयात टाकू असा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475