जिल्हा

आषाढी पंढरपूर यात्रेसाठी ठाणे एसटीच्या जादा गाड्या

आषाढी पंढरपूर यात्रेसाठी ठाणे एसटीच्या जादा गाड्या
आषाढी पंढरपूर यात्रेसाठी ठाणे एसटीच्या जादा गाड्या फोटो: ठाणे वैभव
ठाणे : यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी २९ जुन २३ रोजी आहे. त्यानिमित्त पंढरपुरला जाणा-या भाविकांसाठी एस.टीच्या ठाणे विभागाकडून येत्या २५ जूनपासून ४ जुलै या कालावधीत जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या २९ जुन रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणा-या भाविकांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड, बोरीवली नॅन्सी कॉलनी येथून २५ जुनपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच २९ जुन २३ ते ४ जुलै २३ पासून पंढरपूर चंद्रभागा बस स्थानक येथून परतीची वाहतूक करण्याच येणार आहे. सोडण्यात येणा-या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर या पद्धतीने उपपलब्ध होईल. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकात करण्यात आली आहे. यावर्षी राज्य शासनाकडून एस.टी प्रवाशांसाठी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरीक योजना व महिला सन्मान योजनेतंर्गत महिला प्रवाशांना तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेसाठी जाणा-या प्रवाशांना होणार असल्यामुळे भाविकांनी पंढरपूर यात्रेसाठी एस.टी बसने प्रवास करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागाने केले. भाविकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करुन घ्यावे तसेच सुरक्षित प्रवासाकरीता एसटी बसने प्रवास करण्याचे आवाहन ठाणे विभागाने केले. ठाणे आगारातून २६, २७ आणि २८ जुन रोजी बोरिवली-शीव-पंढरपूर / भाईंदर-ठाणे-पंढरपूर /ठाणे-फलटण/ठाणे दोन आगारातून लोकमान्यनगर-ठाणे-पंढरपूर तसेच ठाणे-इंदापूर-पंढरपूर आणि ठाणे-इंदापूर-पंढरपूर यासह शहापूर-ठाणे-फलटण-पंढरपूर येथे जादा बसगाड्या सोडण्यात येतील, असे एस.टी प्रशासनाने जाहीर केले. ठाण्याव्यतिरिक्त भिवंडी,शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी आणि वाडा येथूनही विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, या जादा बसगाड्यांची एकूण संख्या ६० इतकी आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600