जिल्हा

महानगर गॅस कर्मचारी असल्याचे भासवून वृद्धाला तीन लाखांचा गंडा

महानगर गॅस कर्मचारी असल्याचे भासवून वृद्धाला तीन लाखांचा गंडा
महानगर गॅस कर्मचारी असल्याचे भासवून वृद्धाला तीन लाखांचा गंडा फोटो: ठाणे वैभव

ठाणे: महानगर गॅसचे कर्मचारी असल्याचे भासवून एका ६२ वर्षांच्या सेवानिवृत्त व्यक्तीला ऑनलाइन गंडा घालत सायबर भामट्यांनी त्यांच्या दोन क्रेडिट कार्डमधून तब्बल तीन लाख ८२६५ रुपये लंपास केले. ही घटना नौपाडा परिसरात घडली.

रघुनाथ पॅलेस, भास्कर कॉलनी येथे राहणाऱ्या संजय फणशीकर यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. समोरील व्यक्तीने आपण महानगर गॅसचा कर्मचारी असल्याचे सांगत त्यांचे गॅस खाते निष्क्रिय असून ते सक्रिय करण्यासाठी १० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर बिलासारखी दिसणारी ओपीके फाइल पाठवून त्याद्वारे पैसे भरण्यास सांगण्यात आले.

फणशीकर यांनी गुगल पेच्या माध्यमातून पैसे भरण्याचा प्रयत्न केला; मात्र व्यवहार झाला नाही. त्यानंतर भामट्याने त्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर हटविण्यास सांगितले आणि वारंवार पेमेंट करण्यासाठी प्रवृत्त केले. दरम्यान, रात्री ८.३१ वाजता बँकेचा संदेश आल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख २८५० रुपये, त्यानंतर ८.३५ वाजता ९२,५६५ रुपये आणि ८.५० वाजता पुन्हा एक लाख १२,८५० रुपये वजा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपण कोणतीही खरेदी केली नसल्याने ऑनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475