जिल्हा

प्रारूप मतदार याद्यांतील गंभीर चुका उघडकीस

प्रारूप मतदार याद्यांतील गंभीर चुका उघडकीस
प्रारूप मतदार याद्यांतील गंभीर चुका उघडकीस फोटो: ठाणे वैभव
छाननी कालावधी वाढविण्याची ठाकरे गटाची ठामपा आयुक्तांकडे मागणी ठाणे: ठाणे महानगरपालिकेमार्फत 20 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. परंतु याद्या जाहीर झाल्यानंतरही 24 नोव्हेंबरपर्यंत वार्ड क्रमांक 27 व 29 यांच्या याद्या उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले, ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान करणारी बाब असल्याचा आरोप ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड.रोहिदास मुंडे यांनी केला आहे. वार्ड क्रमांक 28 च्या याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात विसंगती समोर आल्या असून वार्ड क्रमांक 27 मधील “यादी क्रमांक 46” ही चुकून वार्ड क्रमांक 28 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही चूक केवळ तांत्रिक नसून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेला धक्का देणारी असल्याचे श्री.मुंडे यांनी स्पष्ट केले. वार्ड 27 मधील मतदाराला चुकून वार्ड 28 मध्ये मतदान करावे लागणार असून निवडून आलेला नगरसेवक त्या मतदाराच्या मूळ प्रभागातील प्रश्न सोडवू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारूप मतदार याद्यांची छाननी करण्यासाठी किमान 15 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी श्री. मुंडे यांनी ठामपा आयुक्तांकडे केली. वार्ड 27 मधील चुकीने वार्ड 28 मध्ये टाकलेली यादी क्रमांक 46 तत्काळ मूळ वार्ड 27 मध्ये पुनर्स्थापित करावी. याद्यांमधील सर्व विसंगती तातडीने दुरुस्त करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कारवाईची लेखी नोंद घ्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. आयुक्तांना निवेदन देताना ॲड. रोहिदास मुंडे, शहर प्रमुख सचिन पाटील, विभाग प्रमुख चेतन पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475