जिल्हा

दिल्ली-मुंबईनंतर ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस

दिल्ली-मुंबईनंतर ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस
दिल्ली-मुंबईनंतर ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस फोटो: ठाणे वैभव
दिवाळीपूर्वी १०० साध्या इलेक्ट्रिक बसही दाखल होणार ठाणे: मुंबई-दिल्लीनंतर ठाण्याच्या रस्त्यावर दहा इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार असून त्याचबरोबर आणखी शंभर बस देखिल दिवाळीत ठाणेकर प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांचे आरामदायी प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने कात टाकली असून प्रवाशांना जास्तीत जास्त जलद सेवा देण्यासाठी परिवहन प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. केंद्र सरकारच्या मदतीने ठाणे महापालिका दिवाळीपूर्वी दहा डबल डेकर आणि शंभर साध्या इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. त्याची निविदा देखिल प्रसिद्ध करण्यात आली असून सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर या बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे ४५० बस होणार आहेत. दिल्ली आणि मुंबई येथे इलेक्ट्रिक डबल डेकर बस प्रवाशांना सेवा देत आहेत, परंतु ठाण्यात मात्र डबल डेकर बस धावली नाही. दिवाळीत ठाण्याच्या रस्त्यावर या बस धावण्याची शक्यता असून त्यामुळे प्रवाशांना देखिल जलद सेवा मिळणार आहे. त्याचबरोबर डबल डेकर बसचा आनंद देखिल घेता येणार आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात कमी बस असल्याने प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे. स्टेशन, लोकमान्य, वृंदावन, घोडबंदर, वागळे या भागात बसची सेवा अपुरी पडत असल्याने प्रवासी खाजगी बसचा वापर करतात. ठाणे परिवहन सेवेकडे जास्त बस आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रवासी टीएमटीकडे वळतील, असा विश्वास परिवहन सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला. ठाणे परिवहन सेवेकरिता दहा डबल डेकर आणि १०० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी परिवहन विभागाने निविदा काढली असून महासभेच्या मंजुरीनंतर या बस खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन दिवाळीपर्यंत काही बस ठाणे परिवहनच्या ताफ्यात येतील, असा विश्वास ठाणे परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475