जिल्हा
`इलेक्ट्रिक कोल्ड स्टोरेज' गाड्यांची राज्यात प्रथमच सुरुवात
`इलेक्ट्रिक कोल्ड स्टोरेज' गाड्यांची राज्यात प्रथमच सुरुवात
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : राज्यात प्रथमच रिफरऑन सप्लाई चेन सोल्यूशन कंपनीने`इलेक्ट्रिक कोल्ड चेन' साखळी सुरू केली आहे. या कंपनीने ठाणे शहरातून इलेक्ट्रिक कोल्ड चेन गाड्यांची सुरुवात करून ठाण्याचा नावलौकिक वाढविला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक राजेश मोरे, शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ भोईर यांच्या हस्ते आज कार्यालयाचे व इलेक्ट्रिक कोल्ड स्टोरेज गाड्यांचे आज उद्घाटन करण्यात आले.
ठाण्यात रिफरऑन सप्लाई चेन सोल्यूशन प्रा.लि. कंपनीने प्रथमच इलेक्ट्रिकवर कोल्ड चेन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून ठाणेकरांना रोजगारही उपलब्ध होणार आहेत. यावेळी परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव, कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिलाष अमूला, संचालक बाळा अय्यर, संचालक प्रकाश घागरे, मुख्य व्यवसाय प्रमुख सुबोध शिंदे, पत्रकार दीपक शिंदे, शाखाप्रमुख संजय जाधव, संदिप शिंदे, प्रवीण विणकरे आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475