जिल्हा

वृद्ध रुग्णांना मिळणार वैद्यकीय उपचार आणि भावनिक आधार

वृद्ध रुग्णांना मिळणार वैद्यकीय उपचार आणि भावनिक आधार
वृद्ध रुग्णांना मिळणार वैद्यकीय उपचार आणि भावनिक आधार फोटो: ठाणे वैभव
किम्‍स हॉस्पिटल्स आणि इमोहा एल्डरकेअरचा उपक्रम ठाणे: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून किम्‍स हॉस्पिटल्स, ठाणे आणि इमोहा (भारतातील सर्वांत मोठा वृद्धत्वाची काळजी घेणारा ब्रॅण्ड) यांनी ठाणे भागातील वयोवृद्धांची काळजी घेण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल घडवून आणला आहे. २०० ठाणेकर ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आज एल्डरली केअर सर्व्हिसेसचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ठाणे येथील किम्‍स हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सुपर स्पेशलिटी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही आधार देणारी सर्वांगीण काळजी घेणारी परिसंस्था तयार करण्याचे उद्दिष्ट या सहयोगामागे आहे. आजी-आजोबांमध्ये सुरक्षिततेची, आधाराची व आपली काळजी घेणारे कुणीतरी असल्याची भावना निर्माण करण्याचे काम या दोन्ही संस्था मिळून करणार आहेत. वृद्धांना त्यांच्या वेगवेगळ्या तसेच अनेकदा जटिल झालेल्या आरोग्यविषयक गरजा डोळ्यापुढे ठेवून विशेष वैद्यकीय सेवा दिल्या जातील, याची निश्चिती इमोहा ठाणे येथील किम्‍स हॉस्पिटल्समधील जेरिॲट्रिक केअर पार्टनर म्हणून करणार आहे. या सहयोगामुळे रुग्णालय आणि घर यांच्यात असलेले अंतर दूर केले जाणार आहे. ठाण्याच्या किम्‍स हॉस्पिटल्समधून घरी सोडण्यात आलेल्या वयोवृद्ध रुग्णांना घरीही तज्ज्ञांद्वारे वैद्यकीय मदत मिळत राहणार आहे तसेच त्यांची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे दुखण्याने पुन्हा डोके वर काढण्याचा, पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा आणि भावनिक त्रासाचा धोका कमी होणार आहे. इमोहाचे प्रशिक्षित केअरगिव्हर्स आणि नर्सिंग टीम सातत्याने सहाय्य करत राहतील, यांमध्ये औषधे देणे आणि महत्त्वपूर्ण वैद्यकीय बाबींवर लक्ष ठेवणे यांपासून दैनंदिन आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. त्यामुळे जिव्हाळ्याची जागा असलेल्या स्वत:च्या घरात राहूनच वयोवृद्धांना आजारातून बरे होता येईल. वयोवृद्धांची काळजी घेताना भावनिक आयामही तेवढाच महत्त्वाचा आहे. इमोहा अॅपच्या माध्यमातून वयोवृद्धांना देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साही समूहाशी जोडून घेता येईल, ऑनलाइन शोजचा आनंद लुटता येईल, संवादी सत्रांमध्ये सहभागी होता येईल तसेच त्यांच्या दैनंदिन आयुष्यासाठी आनंदी, अर्थपूर्ण तसेच प्रेमाचा ओलावा असलेल्या खास कार्यक्रमांमध्येही भाग घेता येईल. ठाण्यातील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला सर्वोत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा तसेच घरच्या घरी व्यक्तीनुरूप सेवा व भावनिक स्वास्थ्यासाठी आधार मिळेल, याची निश्चिती करण्याच्या दिशेने या उपक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे, असे किम्‍स हॉस्पिटल्सचे प्रादेशिक सीओओ सौरभ गुप्ता यांनी सांगितले. ठाण्यातील केआयएमएम हॉस्पिटल्सच्या सहयोगाने आम्ही एक संपूर्ण परिसंस्था निर्माण करत आहोत, या परिसंस्थेत शारीरिक सेवा व भावनिक आधार यांची सांगड विश्वासाच्या एका छत्राखाली घातली जाणार आहे, असे एमोहा एल्डरकेअरचे सीईओ व सहसंस्थापक सौम्यजीत रॉय यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475