जिल्हा
लोकल पकडताना वृद्ध पडला फलाट आणि रुळाच्या फटीत
लोकल पकडताना वृद्ध पडला फलाट आणि रुळाच्या फटीत
फोटो: ठाणे वैभव
कल्याण: धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करताना ७० वर्षीय वयोवृद्ध फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकला असता पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रसंगधावनाने वयोवृद्धाचे जीव वाचले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
धावती ट्रेन किंवा लोकल पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात असतानाही काही प्रवासी घाईघाईत जीव धोक्यात घालतात. असाच प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानकात समोर आला. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७० वर्षीय पंडित वाघ हे प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधील धोकादायक जागेत पडण्याच्या स्थितीत आले होते. मात्र डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान राखत त्यांना वेळीच बाहेर खेचून त्यांचा जीव वाचवला. ही घटना डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली. या घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले.
दरम्यान, धावती लोकल पकडणे, चालत्या ट्रेनमधून चढणे-उतरणे हे अत्यंत धोकादायक असून प्रवाशांनी घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475