महाराष्ट्र

विश्वगंगा नदीत आठ भाविक बुडाले, मायलेकीचा मृत्यू

विश्वगंगा नदीत आठ भाविक बुडाले, मायलेकीचा मृत्यू
विश्वगंगा नदीत आठ भाविक बुडाले, मायलेकीचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
बुलढाणा : नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी संस्थान येथे दर्शनाकरिता गेलेल्या आठपैकी दोन भाविकांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये मायलेकीचा समावेश आहे. खामगाव परिसरातील सुटाळपुरा येथील आठ भाविक नांदुरा तालुक्यातील नींबोळा देवी संस्थान येथे आले होते. यामध्ये दोन पुरुष आणि सहा महिलांचा समावेश होता. विश्वगंगा नदीच्या काठी पूजेपूर्वी स्नान करण्यासाठी आठही भाविक नदीत उतरले. मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि जून महिन्यात मागील तीन-चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नदीपात्रात भरपूर पाणी आहे. या आठ भाविकांपैकी दोघींना नदीतील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच पोहणे येत नसल्याने त्या मायलेकी खोल पाण्यात बुडाल्या. सोबतच्या भाविकांनी त्यांना बचावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आले. पूनम जामोदे (३२) व आर्वी मयूर जामोदे (५), अशी मृत मायलेकीची नावे आहेत. उर्वरित सहा भाविक सुखरूप बचावले आहेत. त्यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे देवी संस्थान परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची वार्ता येऊन धडकताच खामगाव सुटाळा परिसरात व जामोदे कुटुंबात एकच आकांत उसळला. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नांदुरा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475