महाराष्ट्र

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी अवधूत गुप्ते साधणार संवाद

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी अवधूत गुप्ते साधणार संवाद
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी अवधूत गुप्ते साधणार संवाद फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना नुकताच संसदेचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने 'अविश्रांत श्रीकांत' या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार तसेच निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधतील. डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही प्रकट मुलाखत होईल. राज्यातील सत्तापालट, आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामे यांसह विविध राजकीय आणि अराजकीय गोष्टींचा उलगडा या मुलाखतीमधून होणार आहे. वाचन संस्कृती टिकावी यासाठी गेल्या तीन दशकांहुन अधिक काळ पै फ्रेंड्स लायब्ररी काम करत आहे. या लायब्ररीच्या माध्यमातून डोंबिवली शहरात विविध ठिकाणी पुस्तक प्रदर्शन, पुस्तक आदान प्रदान महोत्सव यांसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याच बरोबर विविध मान्यवर मंडळींच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात येत असते. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही मुलाखत सुरू होईल. गेल्या दोन वर्षात बदललेले राज्यातील राजकारण, ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मिळालेले मुख्यमंत्री पद अशा राजकीय विषयांसह अनेक अराजकीय मुद्द्यांवरही यावेळी संवाद अपेक्षित आहे. यावेळी कला, सामाजिक, क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, वैद्यकीय, विधी आणि राजकीय अशी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मुलाखत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पै फ्रेंड्स लायब्ररीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475