जिल्हा

डीटीडीसीचा दणदणीत विजय; अजित यादवचे शतक हुकले

डीटीडीसीचा दणदणीत विजय; अजित यादवचे शतक हुकले
डीटीडीसीचा दणदणीत विजय; अजित यादवचे शतक हुकले फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेत अ गटात झालेल्या उपांत्य फेरीत डीटीडीसी संघाने चौघुले स्पोर्ट्स क्लबचा १३७ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. डिटीडीसीच्या अजित यादवने ८६ धावा फटकावत समानवीराचा 'किताब पटकावला. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात नाणेफेकीचा मान स्पोर्टिंग क्लब कमिटीचे कार्यकारिणी सदस्य श्रावण तावडे यांना देण्यात आला. डीटीडीसी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फलंदाजांच्या पथ्यावर पडला. मैदानात उतरलेल्या अनिष चौधरी आणि अजित यादव यांनी ८६ धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचे संकेत दिले. दोन षटकार आणि आठ चौकार ठोकत अजित यादवने ८६ धावा केल्या तर अनिष चौधरीने एक षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. त्यानंतर विनय कुंवर ३३, सत्यलक्ष्य जैन २८ आणि ओंकार घुले याने २५ धावांचे योगदान दिले. डीटीडीसीने ३५ षटकांत नऊ गड्यांच्या बदल्यात २६४ धावांचा डोंगर उभा केला. चौगुले स्पोर्ट्स क्लबच्या तनिष सावे याने तीन तर आदित्य राणे याने दोन गडी बाद केले. डीटीडीसी संघाचे हे आव्हान चौघुले स्पोर्ट्स क्लबला झेपले नाही. सुरज ललवाणी याने सर्वाधिक २४ धावा केल्या तर उर्वरीत फलंदाजांनी निराशा केली. डीटीडीसीच्या श्रेयस गुरव याने तीन तर राजेश सरदार याने दोन गडी बाद केले. चौघुले स्पोर्ट्स क्लबने २८.३ षटकांत अवघ्या १२७ धावा केल्या. डीटीडीसीच्या अजित यादव सामनावीर ठरला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475