जिल्हा

कल्याण चक्कीनाका परिसरात मद्यधुंद टेम्पो चालकाचा राडा

कल्याण चक्कीनाका परिसरात मद्यधुंद टेम्पो चालकाचा राडा
कल्याण चक्कीनाका परिसरात मद्यधुंद टेम्पो चालकाचा राडा फोटो: ठाणे वैभव
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत केली पोलीस चौकीची तोडफोड कल्याण : कल्याण पूर्वेकडे चक्की नाका परिसरात मद्यपी टेम्पोचालक हा गोंधळ घालत होता. याचवेळी कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. हा टेम्पोचालक मद्यधुंद असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई सुरू केली. ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह प्रकरणी वाहतूक पोलिसांनी टेम्पो चालकावर कारवाई केली असता परिस्थिती हाताबाहेर गेली. मद्यधुंद आणि मुजोर टेम्पो चालकाने पोलिसांशी हुज्जत घालत वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत पोटात लाथ मारली. इतकेच नव्हे तर वाहतूक पोलिसांनी मद्यपी टेम्पोचालक महेश साळुंखे याला वाहतूक पोलीस चौकीत नेले असता तिथे देखील त्याने अरेरावी करत गोंधळ घालत चौकीची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचालक महेश साळुंखे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475