जिल्हा

वेळेत नालेसफाई अन्यथा काळी यादी

वेळेत नालेसफाई अन्यथा काळी यादी
वेळेत नालेसफाई अन्यथा काळी यादी फोटो: ठाणे वैभव
पालिका प्रशासनाचा ठेकेदारांना इशारा ठाणे: नेहमी वादग्रस्त ठरणारी नालेसफाई यंदाही संथ गतीमुळे चर्चेत आली आहे. अनेक ठिकाणी पूर्ण सफाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने मनुष्यबळ वाढवले असून वेळेत नालेसफाई झाली नाही तर काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही ठेकेदारांना दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कामे वेळेत सुरु होऊनही अनेक प्रभागांत नालेसफाई झाली नसल्याची बाब समोर आली आहे. यानंतर पालिका प्रशासनाने अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक घेत, नाले सफाईची मुदत वाढवून दिली आहे. मुंब्रा, दिवा, माजिवडा या प्रभाग समितीअंतर्गत नाले सफाईची कामे संथगतीने सुरु असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीत पूर्वी २०० कामगार होते, त्यात आणखी २०० कामगार वाढविण्यात आले असून ४०० कामगारांच्या माध्यमातून सफाई करण्यात येत आहे. दिवा प्रभाग समितीत १३० ऐवजी आता २०० कामगारांकडून सफाई करण्यात येत आहे. माजिवडा प्रभाग समितीत अतिरिक्त ३० कामगार वाढविण्यात आले आहेत. तर उर्वरित प्रभाग समिती हद्दीत आवश्यकतेनुसार १० ते २० कामगार वाढविण्यात आल्याची माहिती उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली. नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्यांच्या काठावर पडून असल्याचे दिसून येत आहे. अशातच ३१ मेच्या मुदतीसाठी तीन दिवस शिल्लक असताना, नालेसफाईसाठी ५ जूनची नवी मुदत दिली. मुदत वाढवून देऊनही वेळेत नाले सफाई न झाल्यास थेट काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचा इशारा घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी ठेकेदारांना दिला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475