जिल्हा

नाल्यावरील बांधकामे महसूल खात्याच्या रडारवर

नाल्यावरील बांधकामे महसूल खात्याच्या रडारवर
नाल्यावरील बांधकामे महसूल खात्याच्या रडारवर फोटो: ठाणे वैभव
ठाणे: नदी पात्र आणि नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून उभारण्यात येणाऱ्या बांधकामावर संक्रात येणार असून महसूल विभागाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करताना नाल्यातील बांधकामावर मात्र कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
राज्याच्या महसूल विभागाने २५ मार्च रोजी राज्यातील गायरान जमिनीवरील झोपडपट्टी आणि इतर अनधिकृत बांधकामे नियमित कारण्याबाबत अध्यादेश काढला असून पाचशे चौरस फुटापर्यंतची गायरान जमिनीवरील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अध्यादेशामध्ये नाल्यामध्ये बांधण्यात आलेल्या बांधकामावर मात्र कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठाणे शहरातील अनेक नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून काही बांधकाम व्यवसायिकानी नाल्यात बांधकाम केले आहे तर काही जणांनी नाल्यातच बांधकाम केल्याचे अनेक ठिकाणी नजरेस पडत आहे. येउरमध्ये काही हॉटेल आणि ढाबे तर नाल्यावरच बांधण्यात आले आहेत. नाल्यापासून ठराविक अंतर ठेऊन बांधकाम करण्याचा नियम असतानाही नाल्याजवळ बांधकाम केले जात आहे. अशी बांधकामे नियमित होणार नाही तसेच वन आणि खाडी किनारी असलेल्या बांधकामांना देखिल या अध्यादेशाचा फटका बसणार आहे. त्यामुळे ठाण्यातील नाल्यांवर आणि त्यालगत बांधण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475