जिल्हा

आशेळेपाडा परिसरात नाला साफसफाई पूर्ण

आशेळेपाडा परिसरात नाला साफसफाई पूर्ण
आशेळेपाडा परिसरात नाला साफसफाई पूर्ण फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र १३ च्या भाजपा नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड यांच्या पाठपुराव्याने आशेळेपाडा परिसरातील शिवसेना शाखा ते सेंट पॉल स्कूल दरम्यानच्या नाल्याच्या सखोल साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या नाला साफसफाईमुळे पावसाळ्यात होणारी पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नाल्यातील गाळ, कचरा व अडथळे दूर केल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होणार असून, परिसरातील स्वच्छतेतही सुधारणा होणार आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेता ही साफसफाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे होणाऱ्या रोगांना आळा घालण्यासाठी हे काम उपयुक्त ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475