महाराष्ट्र
डॉ. दत्ता पाणंदीकर यांची टीओजीएसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
डॉ. दत्ता पाणंदीकर यांची टीओजीएसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दत्ता पाणंदीकर यांची ठाणे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (टीओजीएस) च्या ११ वे अध्यक्ष म्हणून हॉटेल फॉर्च्यून पार्क लेकसिटी येथे नियुक्ती करण्यात आली.
फिगोचे माजी अध्यक्ष डॉ. सी. एन. पुरंदरे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एफओजीएसआयचे माजी अध्यक्ष डॉ.नंदिता पालशेतकर आणि डॉ. हृषिकेश पै हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जवळपास 100 लोकांची याप्रसंगी उपस्थिती होती. डॉ. उज्वला बर्दापूरकर यांनी सचिव पदाची शपथ घेतली. ठाणे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (टीओजीएस) महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी एक अग्रणी संस्था आहे. ही नवीन कार्यकारिणी मार्च २०२५ पर्यंत पदभार सांभाळणार आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475