जिल्हा
वागळे इस्टेट-भाईंदरपाडा मार्गावर धावली डबल डेकर
वागळे इस्टेट-भाईंदरपाडा मार्गावर धावली डबल डेकर
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणेकरांनी डोळे लावलेली ठाणे परिवहन सेवेची डबल डेकर बस अखेर वागळे इस्टेट येथील आयटीआय सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर धावली. आणखी एक डबलडेकर बस दोन ते तीन दिवसांत ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबई परिवहन सेवेच्या धर्तीवर ठाणे परिवहन सेवेने डबल डेकर बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय काही महिन्यांपुर्वी घेतला. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. टीएमटीच्या ताफ्यात एकूण १० विद्युत वातानुकूलीत डबलडेकर बसगाड्या दाखल होणार असून त्यापैकी एक बसगाडी दाखल झाली होती. परंतु नोंदणी प्रक्रियेमुळे ती प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध झाली नव्हती. नोंदणी प्रक्रिया उरकून आता ही विद्युत वातानुकूलित डबलडेकर बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२ वरील आयटीआय सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस सकाळी आठ ते बारा आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत चालविण्यात येत आहे. सध्या या बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला, तरी येत्या काही दिवसांत प्रवाशांची संख्या वाढेल, असा विश्वास परिवहन प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475