जिल्हा

मध्य-पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर डबल-डेकर पूल

मध्य-पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर डबल-डेकर पूल
मध्य-पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर डबल-डेकर पूल फोटो: ठाणे वैभव
वरळी-शिवडी उन्नत मार्गाला गती
मुंबई : मुंबईतील वरळी-शिवडी उन्नत मार्गाला चालना मिळत आहे. शुक्रवारी प्रभादेवी येथील लक्ष्मी निवास पाडण्यास सुरूवात झाली. या उन्नत प्रकल्पाच्या मार्गावर अनेक स्थानकांचे घरे, इमारती असल्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. पण लक्ष्मी निवासाच्या पाडकामासह पुनर्वसनातील एक प्रमुख अडथळा दूर झाला असून प्रकल्प मार्गी लागला आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू आहे. त्यांना या रहिवाशांसाठी 90 कोटी खर्चून म्हाडाकडून घरे मिळवली आहेत. त्यामुळे या दोन्ही इमारतीमधील सुमारे 75 रहिवाशांना स्वतःचं घर मिळालं आहे. लक्ष्मी निवास पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर तिथे पाडकाम सुरू केलं. परंतु, हाजी नूरानीमधील काही रहिवासी अद्याप बाहेर पडले नाहीत.
हा उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. अटल सेतूशी जोडणी असलेल्या या मार्गामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, या उन्नत मार्गासाठी प्रभादेवी येथे एक डबलडेक उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच 100 वर्ष जुन्हा प्रभादेवी (एलफिन्सटन) उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू झालं. या मार्गावर या दोन इमारती अडथळा ठरत होत्या. त्यामुळे येथील नागरिकांचं पुनर्वसन करून या इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुनर्रचित एल्फिन्सटन पूल सेनापती बापट मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाशी जोडणार आहे. या डबल डेकर उड्डाणपुलाचा एक भाग वांद्रे वरळी सी-लिंकला जोडणार आहे तर दुसरा भाग शिवडी येथे अटल सेतूला जोडे, जमिनीपासून 27 मीटर उंचीवर तयार होत असलेला हा पूल पूर्व द्रुतगती मार्ग, बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल आणि दक्षिण मुंबईतील रेल्वे मार्गिकांवरून जाणार आहे. हा संपूर्ण कॉरिडोर सप्टेंबर 2026पर्यंत पूर्ण करण्याची एमएमआरडीएने मुदत दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475