जिल्हा
ज्युपिटर रुग्णालयात मृत दोन रुग्णांच्या अवयवांचे दान
ज्युपिटर रुग्णालयात मृत दोन रुग्णांच्या अवयवांचे दान
फोटो: ठाणे वैभव
या वर्षातील दहावे अवयवदान
ठाणे : येथील प्रसिद्ध ज्युपिटर रुग्णालयात मृत झालेल्या दोन रुग्णांच्या विविध अवयवांचे दान करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्या अवयवांचे दान करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
मुंबई क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अवयवांचे वितरण करण्यात आले आहे. हे दान या वर्षातील दहावे अवयवदान आहे. अवयव दान केलेल्या व्यक्ती अनुक्रमे ३० वर्षीय आणि ६३ वर्षीय असून, दोघेही पुरुष आहेत. ३० आणि ६३ वर्षीय पुरुषांच्या नातेवाईकांनी त्यांचे देह सरणावर ठेवण्याऐवजी त्यांनी त्यांचे अवयव अन्य गरजूंच्या कामी येतील, अशा उदात्त हेतूने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
तीस वर्षीय पुरुषाचे ह्रदय, लिव्हर, कॉर्निआ व दोन्ही किडनी हे अवयव आणि ६० वर्षीय पुरुषाचे ह्रदय आणि लिव्हर हे अवयवदान करण्यात आले, अशी माहिती मुंबई झेडटीसीसीच्या उर्मिला महाजन आणि मुंबई झेडटीसीसीच्या प्रशासक अधिकारी ट्रान्सप्लान्ट समन्वयक संगीथा देसाई यांनी दिली.
यावर्षीचे पहिले अवयवदान ६ जानेवारी २३ रोजी वाशी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात करण्यात आले होते. नव्या वर्षाची सुरुवात ह्रदय आणि दोन्ही किडनींच्या दानाने सुरु झाली होती.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475