महाराष्ट्र

ज्युपिटर रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णाच्या पाच अवयवांचे दान

ज्युपिटर रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णाच्या पाच अवयवांचे दान
ज्युपिटर रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णाच्या पाच अवयवांचे दान फोटो: ठाणे वैभव
ठाणे : येथील प्रसिद्ध ज्युपिटर रुग्णालयात मृत झालेल्या पुरुष रुग्णाने अलिकडेच त्याच्या पाच अवयवांचे दान करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. मुंबई क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पाच अवयवांचे वितरण करण्यात आले आहे. हे दान या वर्षातील तिसरे अवयवदान आहे. अवयव दान केलेली व्यक्ती २६ वर्षीय पुरुष आहे. अवघ्या २६व्या वर्षी संपूर्ण पार्थिव सरणावर जाण्याऐवजी त्यांनी ह्रदय, लिव्हर, पॅनक्रीआज, कॉर्निआ आणि दोन्ही किडनी हे अवयव अन्य गरजूंच्या कामी येतील, अशा उदात्त हेतूने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन हा महत्वाचा निर्णय घेतला, अशी माहिती मुंबई झेडटीसीसीच्या उर्मिला महाजन यांनी दिली. या वर्षीचे चौथे अवयवदान मुंबईतील डॉ. बालाभाई नानावटी आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475