जिल्हा

डोंबिवलीचे सोहन मांजरेकर सीए परीक्षेत देशात तिसऱ्या स्थानी

डोंबिवलीचे सोहन मांजरेकर सीए परीक्षेत देशात तिसऱ्या स्थानी
डोंबिवलीचे सोहन मांजरेकर सीए परीक्षेत देशात तिसऱ्या स्थानी फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसराने पुन्हा एकदा संपूर्ण सीए क्षेत्राला अभिमानित केले आहे. डोंबिवलीचे विद्यार्थी सोहन मांजरेकर यांनी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या आज घोषित सीए फायनल परीक्षेत संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक पटकावला आहे. शहरातील सोहन मांजरेकर याने आयसीएआय सीएच्या अंतिम परीक्षेत पतियाळा येथील नूर सिंगला याने ६००पैकी 499 गुण (83.17%) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. हावडा येथील रितिज सराफ याने 475 गुण (79.17%), मिळवत दुसरा तर डोंबिवली पूर्व येथील सोहन मांजरेकर याने 473 गुण (78.83%) मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. सोहन मांजरेकर यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कल्याण-डोंबिवली परिसराने यापूर्वीही सातत्याने अखिल भारतीय मानांकनधारक विद्यार्थी दिले आहेत. त्यामुळे हा परिसर सीए क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून ओळखला जातो. आपला आनंद व्यक्त करताना आयसीएआय कल्याण-डोंबिवली शाखाचे अध्यक्ष सीए अमित मोहरे म्हणाले की "सोहनच्या या अभूतपूर्व यशाचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. राष्ट्रीय स्तरावर तिसरे स्थान मिळवणे हे केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण कल्याण-डोंबिवली परिसरासाठी गौरवाची बाब आहे. अखिल भारतीय मानांकनधारक विद्यार्थी देणे ही आता आमच्या परिसराची परंपरा बनली आहे आणि सोहनने ती परंपरा अधिक उज्ज्वल केली आहे." सीए मोहरे यांनी पुढे सांगितले की, सध्या ५,१०० हून अधिक सीए सभासद आणि १३ हजारहून अधिक विद्यार्थी असलेली आयसीएआय कल्याण-डोंबिवली शाखा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. सध्या पाच अभ्यासिका आणि दोन आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून कार्यरत असलेली ही शाखा लवकरच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वतःच्या सुसज्ज इमारतीत स्थलांतरित होणार आहे. जेणेकरून विद्यार्थी आणि सभासदांसाठी एक सक्षम शैक्षणिक व व्यावसायिक परिसंस्था निर्माण होईल. दरम्यान शाखेच्या कार्यकारिणीने सोहम, त्यांचे कुटुंब, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांना उज्ज्वल व्यावसायिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475