जिल्हा

इको-फ्रेंडली मखर प्रदर्शनाला डोंबिवलीकरांची झुंबड

इको-फ्रेंडली मखर प्रदर्शनाला डोंबिवलीकरांची झुंबड
इको-फ्रेंडली मखर प्रदर्शनाला डोंबिवलीकरांची झुंबड फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : डोंबिवली शहरातील निशिकांत मोडक यांच्याकडून गेल्या ३५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या इको-फ्रेंडली मखरांच्या भव्य प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.
हे प्रदर्शन शुभम बँक्वेट, पहिला मजला, मानपाडा रोड, शुभांगी दर्शन बिल्डिंग, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, डोंबिवली (पूर्व) येथे असून या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी  भाजप मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार, नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते.
मखरांच्या निर्मितीमागील कलाकारांची कल्पकता, कलाकौशल्य तसेच पर्यावरणपूरक दृष्टिकोन विशेष कौतुकास्पद ठरत आहे. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या प्रदर्शनातून देण्यात येत आहे, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या प्रदर्शनाला डोंबिवलीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात विविध प्रकारची मखरे आहेत, असे निशिकांत मोडक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475