जिल्हा

विस्तारित स्थानकाच्या रुळावर रेल्वे प्रशासनाची ढकलगाडी

विस्तारित स्थानकाच्या रुळावर रेल्वे प्रशासनाची ढकलगाडी
विस्तारित स्थानकाच्या रुळावर रेल्वे प्रशासनाची ढकलगाडी फोटो: ठाणे वैभव

* ठामपाचे अर्धे काम पूर्ण * रेल्वे सुस्त, काम शून्य

ठाणे : रेल्वे स्थानकात वाढणाऱ्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असताना रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्याचे नवीन विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने जवळपास अर्धे काम पूर्ण केले असताना रेल्वे प्रशासनाने मात्र कामाला सुरूवातच केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नवीन विस्तारित स्थानक प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. यापैकी पालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या १० एकर जमिनीवर स्टेशन इमारतीसमोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस डेक बांधण्यात येणार असून वाहनांसाठी तीन मार्गिका तसेच इतर कामे ठाणे महापालिका करणार आहे. डेकचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले असून मार्गिकांचे काम देखील ४० टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. यापैकी ३.७७ एकरमध्ये जे काम रेल्वे प्रशासनाला करायचे आहे त्या कामाला अद्याप सुरवातच झालेली नाही. २०१८ पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्ष लागणार असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. ठाणे स्थानकात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गर्दीतून लोकल पकडावी लागते. हे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागल्यास ठाणे स्थानकातील सुमारे ५० टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे. मात्र याचे गांभीर्य रेल्वे प्रशासनाला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी वाढला असून परिणामी त्याचा खर्चही अनेक कोटींनी वाढला आहे. २०१८ साली या प्रकल्पाचा खर्च हा २६३ कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये ६४ कोटींची वाढ झाली असून हा खर्च ३२७ कोटींवर गेला आहे. यामध्ये ठाणे महापालिका १४२ कोटी तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475