जिल्हा

मराठीतून व्यवहार करा : मनसेची एसबीआय शाखेत धडक

मराठीतून व्यवहार करा : मनसेची एसबीआय शाखेत धडक
मराठीतून व्यवहार करा : मनसेची एसबीआय शाखेत धडक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: जिल्ह्यातील राष्ट्रीय तसेच सहकारी बँकांनी आठ दिवसांत बँकेतील व्यवहार मराठीत करावा अन्यथा त्यांना महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा आज मनसेने दिला आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि नेते अविनाश जाधव यांच्यासह शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या नौपाडा शाखेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठी भाषेत कारभार करावा असे निवेदन दिले. या बँकेत एक लाख मराठी भाषिक ग्राहक असून कर्मचारी मात्र इतर भाषिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांची येथे खाती आहेत, त्यांच्याशी मराठी भाषेत बोलणारे कर्मचारी नियुक्त करावेत तसेच बँकेतील सर्व पाट्या मराठीत कराव्यात असे निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार बँकेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही. व आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावेत, असे पत्रक मनसेच्या वतीने अविनाश जाधव, रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. आज हात जोडून, नाही ऐकलंत तर हात सोडून समजावले जाईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रविंद्र सोनार, उप शहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे, सुशांत सूर्यराव, सुशांत डोंबे विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, संदिप साळुंखे, मनोज चव्हाण, प्रितेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475