जिल्हा

कल्याणमध्ये कैलाश खेर बॅण्डच्या सुरात उगवणार दिवाळी पहाट

कल्याणमध्ये कैलाश खेर बॅण्डच्या सुरात उगवणार दिवाळी पहाट
कल्याणमध्ये कैलाश खेर बॅण्डच्या सुरात उगवणार दिवाळी पहाट फोटो: ठाणे वैभव
भाजपा आणि कपिल पाटील फाउंडेशनचा उपक्रम कल्याण: भाजपा व कपिल पाटील फौंडेशनतर्फे कल्याणमध्ये साई चौकात बुधवारी पहाटे ५ वाजता आयोजित केलेल्या दिवाळी पहाटमध्ये यंदा प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या बॅण्डचे सूर रंगणार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध हास्य कलाकार सुगंधा मिश्रा व संकेत भोसले यांची हास्य मैफलही रसिकांना अनुभवायला मिळेल. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी कल्याण पश्चिममधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. यापूर्वी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, अवधुत फडके,गायिका प्रियंका बर्वे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, प्रसिद्ध कलाकार अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रे, भूमी त्रिवेदी, सावनी रविंद्र, जुईली जोगळेकर यांच्यासह प्रसिद्ध हास्य कलाकारांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली होती. यंदा या दिवाळी पहाटमध्ये प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण `कैलासा' बॅण्डचे सूर उमटणार आहेत. त्यांच्याकडून सुमारे दोन तास प्रसिद्ध गाणी सादर केली जातील. देशभरातील रसिकांच्या पसंतीचे हास्य कलाकार सुगंधा मिश्रा व संकेत भोसले यांचेही खुमासदार विनोदी चुटके रसिकांना ऐकावयास मिळतील. यापूर्वी बदलापूर येथे अटल संध्यात नागरिकांनी कैलास खेर बॅण्ड ऐकला होता. यंदा कल्याणकरांना ही मेजवानी उपलब्ध होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर रेश्मा रमेश करणार आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475