जिल्हा
शिवसेनेकडून दिवाळी फराळ साहित्य फक्त 10 रुपयांत
शिवसेनेकडून दिवाळी फराळ साहित्य फक्त 10 रुपयांत
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : मागील अनेक वर्षांप्रमाणे दिवाळीनिमित्त लागणारे 500 रुपयांचे विविध फराळाचे साहित्य शिवसेनेने फक्त 10 रुपयांत उपलब्ध करून नागरिकांच्या दिवाळीत गोडवा आणला आहे.
शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रयत्नांतून यंदाही दिवाळीपूर्वी लागणारे गोडेतेल, रवा, मैदा, साखर, शेंगदाणे, पोहे, चिवड्याला लागणारा मसाला असे 428 रुपये किंमतीचे फराळ साहित्याचे आज खुंटवली परिसरातील भवानी चौकात वाटप केले. साहित्य घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडप टाकण्यात आला होता, रांगेत उभे राहून नागरिकांना दिवाळीसाठी लागणाऱ्या फराळाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.
गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेतर्फे शहरवासीयांसाठी विविध उपक्रमाप्रमाणेच दिवाळीचा शिधा कमी किमतीत उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती शहरप्रमुख वाळेकर यांनी दिली. माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, राजेंद्र वाळेकर, ॲड. निखील वाळेकर, पद्माकर दिघे, संजय गावडे, अरविंद मालुसरे, यांच्याप्रमाणेच महिला आघाडीच्या पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत नागरिकांना फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475