महाराष्ट्र

दिव्यात श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताधिक्य मिळण्याचा विश्वास

दिव्यात श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताधिक्य मिळण्याचा विश्वास
दिव्यात श्रीकांत शिंदे यांना भरघोस मताधिक्य मिळण्याचा विश्वास फोटो: ठाणे वैभव
ठाणे: गुरुवारी दिवा शहरात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित रॅलीला दिवावासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी दिव्यातील जनतेनेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केल्याचे शिवसेना उपविभाग प्रमुख कैलेश पाटील यांनी सांगितले. कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे दिवा शहरात विकासात्मक मोठे काम असून या कामाच्या जोरावरच त्यांना दिवा शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल. दिवा शहराचे लोकप्रिय माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी मागील दहा वर्षापासून दिवा शहरातील जनतेला वेळोवेळी विविध विकास कामे व सामाजिक कार्याच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. शैलेश पाटील यांचे कार्यकर्तेही या निवडणुकीत जोमाने काम करत आहेत. त्याचबरोबर रमाकांत मढवी यांनी विकास कामे करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.दिवा शहरातील आठही माजी नगरसेवक त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मेहनतीच्या जोरावर दिवा शहरातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असेही कैलेश पाटील यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475