जिल्हा

दिव्याला मिळाला स्वतंत्र पिनकोड

दिव्याला मिळाला स्वतंत्र पिनकोड
दिव्याला मिळाला स्वतंत्र पिनकोड फोटो: ठाणे वैभव
ठाणे: 'जागा हो दिवेकर' या संस्थेच्या माध्यमातून विजय भोईर करत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून दिव्याला स्वतंत्र पिनकोड देण्यात आला आहे. विजय भोईर आणि त्यांचे सहकारी यांनी जनरल पोस्ट ऑफिस मुंबई येथे अधिकाऱ्यांना भेटून मागणी केली होती. दिवा आणि मुंब्रा यांना संयुक्त पिनकोड असल्याने नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. याबाबत त्यांनी वेळोवेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यामार्फत पक्षाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. विजय भोईर यांनी स्वतःही दिल्लीला पत्रव्यवहार केला होता. तत्कालीन खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनाही दिल्लीला प्रत्यक्ष भेटून पत्र दिले होते. अखेर दिव्यासाठी स्वतंत्र ४००६११ हा पिनकोड जाहीर होऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढील कार्यवाही सुरू झालेली आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने सर्व नागरिकांकडून तसेच दिव्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475