जिल्हा

फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांना कंत्राटदार दोषी

फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांना कंत्राटदार दोषी
फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांना कंत्राटदार दोषी फोटो: ठाणे वैभव
रस्ता दुरुस्तीचे आयुक्तांकडून आदेश भाईंदर: फाऊंटन ते गायमुख या रस्ता दुरुस्तीच्या निधीवरून वाद सुरू असतानाच मीरा-भाईंदर महापालिकेने मागील वर्षीच्या दुरुस्तीच्या कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारालाच दोषी धरत उत्तरदायित्व कालावधीअंतर्गत रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. फाऊंटन ते गायमुख मार्गावरील सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा ठाणे-घोडबंदर मार्ग मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे आली. राज्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग असून अवजड वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे रस्त्याची झीज होते. पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडत असल्याने दरवर्षी दुरुस्तीची आवश्यकता भासते. यंदा मात्र या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेचा निधी खर्च करण्यास सत्ताधारी भाजपने विरोध केला. निधीअभावी या रस्त्याची दुरुस्ती राज्य शासनानेच करावी तसेच हा मार्ग पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा, असा ठराव महापौरांनी मंजूर करून प्रशासनाला निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, प्रवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन महापालिकेला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. मात्र, निधी खर्चाबाबतची भूमिका कायम असल्याने प्रशासन अडचणीत सापडले होते. दरम्यान, मागील वर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले होते. निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदारामार्फत हे काम करण्यात आले होते. मात्र अवघ्या वर्षभरातच रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याने आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी संबंधित कंत्राटदारावर बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरदायित्व कालावधीअंतर्गत कंत्राटदाराकडूनच रस्त्याची दुरुस्ती करून घेतली जात असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475