जिल्हा
ठामपाकडून आज १००१ नामनिर्देशनपत्रांचे वाटप
ठामपाकडून आज १००१ नामनिर्देशनपत्रांचे वाटप
फोटो: ठाणे वैभव
वागळेमधून एका उमेदवाराचा अर्ज दाखल
ठाणे: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी १०६९ नामनिर्देशन पत्रांचे वाटप झाल्यानंतर आज बुधवारी ठाणे शहरातील नऊ प्रभागांतून आज एकूण १००१ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
ठामपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत महापालिकेने २०७० नामनिर्देशन पत्रे वाटप केली असून इच्छुकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान वागळे प्रभाग समितीमधून अपक्ष उमेदवार संजय पंड्या यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्याकडे दाखल केला.
प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 8 करिता माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती कार्यालयाकडून 190 नामनिर्देशन पत्रे वितरित करण्यात आली. प्रभाग क्रमांक 4, 5, 7 करिता वर्तकनगर प्रभाग समितीमार्फत 104, प्रभाग क्रमांक 6, 13, 14, 15 करिता लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमार्फत 141, प्रभाग क्रमांक 16, 17, 18 करिता वागळे प्रभाग समितीमार्फत 81, प्रभाग क्रमांक 19, 20, 21, 22 करिता नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमार्फत 102, प्रभाग क्रमांक 10, 11, 12 करिता उथळसर प्रभाग समितीमार्फत 91, प्रभाग क्रमांक 9, 23, 24, 25 करिता कळवा प्रभाग समितीमार्फत 67, प्रभाग क्रमांक 26, 31, 30, 32 करिता मुंब्रा प्रभाग समितीमार्फत 132 आणि प्रभाग क्रमांक 27, 28, 29, 33 करिता दिवा प्रभाग समितीमार्फत 93 नामनिर्देशन पत्रे वितरित करण्यात आली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475