जिल्हा

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन
दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : दिघा रेल्वे स्थानकातील सर्व कामे पूर्ण झाली असून हे स्थानक प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुले करण्याची मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही दानवे यांनी दिली आहे. डॉक्टर संजीव नाईक यांच्या मागणीनुसार नवीन दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक यांच्या समवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, दिघा येथील स्थानिक नगरसेवक नवीन गवते उपस्थित होते. आमदार गणेश नाईक यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना स्थानकाच्या कामासंदर्भात केल्या होत्या. या पाहणी दौऱ्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समवेत लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची ३ मार्च २०२३ रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने डॉक्टर संजीव नाईक यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे १६ मार्च २०२३ रोजी भेट घेतली. दिघा स्थानकातील जवळजवळ सर्व अपूर्ण कामे पूर्ण झाली असून हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुले करण्याची मागणी नाईक यांनी केली. रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यासंदर्भात लगेचच वरिष्ठ रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून ते ६ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे हे अधिवेशन संपतात दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475