जिल्हा

नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्ताला लाच घेताना अटक

नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्ताला लाच घेताना अटक
नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्ताला लाच घेताना अटक फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी अतिक्रमण उपायुक्तांनी ४२ हजारांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले आहे. ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. यातील तक्रारदार असलेल्या कंत्राटदाराने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत काही कामे पूर्ण केली होती. या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांनी संबंधित कंत्राटदाराकडे मोठ्या रक्कमेची मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा करूनही लाचेशिवाय बिल पुढे सरकणार नाही, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतल्याने अखेर त्रस्त कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एक वर्षापासून अतिक्रमणाचं बिल देणं बाकी होतं. दीड कोटींचे बिल मंजूर करण्यासाठी ४२ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर सापळा लावण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे लाचेची ४२ हजार रक्कम स्वीकारताना डॉ. गायकवाड यांना रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475