महाराष्ट्र

कोरोनानंतर डेंग्यू-मलेरियावर लस

कोरोनानंतर डेंग्यू-मलेरियावर लस
कोरोनानंतर डेंग्यू-मलेरियावर लस फोटो: ठाणे वैभव
पुणे: सीरमने कोरोनानंतर डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर लस तयार करण्यात यश मिळवलं आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरम इस्टिट्युटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो, डेंग्यूमुळे काही लोक दगावलेही जातात. त्यामुळे अनेक वर्षापासून सीरम इस्टिट्युटचे शास्त्रज्ञ या रोगांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते. या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात आता यश आलंय.सीरमचे शास्त्रज्ञ डेंग्यू आणि मलेरिया बरोबरचं कर्करोगावरही संशोधन करत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475