जिल्हा
अनंत चतुर्थीला कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा
अनंत चतुर्थीला कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा
फोटो: ठाणे वैभव
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.डावखरे यांची मागणी
ठाणे: विधान परिषद आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन अनंत चतुर्थीनिमित्त कोकण विभागातील सर्व महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
आपल्या पत्रात आमदार डावखरे यांनी नमूद केले आहे की, कोकणात अनंत चतुर्थी हा दिवस अत्यंत श्रद्धा व उत्साहाने साजरा केला जातो. गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कोकणात सार्वजनिक वाहतूक, गर्दी आणि स्थानिक पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होतो. तसेच, अनेक विद्यार्थी व प्राध्यापक हे आपल्या गावी गेलेले असल्याने या दिवशी महाविद्यालयांमध्ये उपस्थिती ठेवणे शक्य होत नाही. त्या अनुषंगाने, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांतील सर्व महाविद्यालयांना अनंत चतुर्थीनिमित्त एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475