जिल्हा

पेंढारकर महाविद्यालयाची वाढीव फी कमी करण्याचा निर्णय

पेंढारकर महाविद्यालयाची वाढीव फी कमी करण्याचा निर्णय
पेंढारकर महाविद्यालयाची वाढीव फी कमी करण्याचा निर्णय फोटो: ठाणे वैभव
* वाढीव फी परत देण्याचे आदेश * सेव्ह पेंढारकर मोहीमेला यश कल्याण: सेव्ह पेंढारकर मोहीमेला आणखी एक यश आले असून पेंढारकर महाविद्यालयाची वाढीव फी कमी करण्याचा निर्णय व वाढीव फी परत देण्याचे आदेश कॉलेज प्रशासनाने दिले आहेत. यामुळे के.व्ही.पेंढारकर कॉलेज हे अकरावी आणि बारावीचे प्रवेश शुल्क कमी करणारे आणि ७०-८०टक्के फी कमी करणारे महाराष्ट्रातले पहिले कॉलेज असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या निर्णयामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचेल, गोरगरिब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची उन्नती होईल अशी प्रतिक्रिया "सेव्ह पेंढारकर" मोहिमेच्या वतीने देण्यात आली. "सेव्ह पेंढारकर"च्या एक वर्षाच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून प्रशासनाची नियुक्ती आणि महाविद्यालयाच्या फी वाढीस आळा देखील बसला आहे. "सेव्ह पेंढारकर" या संघटनेने के.व्ही.पेंढारकर महाविद्यालय व व्यवस्थापनाविरुद्ध मागील एक वर्षांपासून सातत्याने आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून, सरकारने महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या निर्णयानंतर "सेव्ह पेंढारकर" संघटनेच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेतली. डोंबिवली तसेच परिसरातील अनेक गरजू कुटुंबातील विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेतात. हे महाविद्यालय लोकप्रिय असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे केंद्र आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात यावे, जेणेकरून प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला प्रवेश घेणे शक्य होईल. मागील वर्षी आणि यंदाच्या वर्षीच्या शुल्कात मोठा फरक होता, याची चौकशी करावी, अशी मागणी देखील करण्यात आली. "सेव्ह पेंढारकर" संघटनेच्या या सकारात्मक पुढाकाराची दखल घेत, महाविद्यालय प्रशासनाने शुल्कवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा आमचा मोठा विजय आहे आणि आमचा लढा हा सामान्य विद्यार्थ्यांसाठी होता व पुढेही राहील अशी प्रतिक्रिया सेव्ह पेंढारकर मोहिमेच्या वतीने देण्यात आली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475